Kolhapur CPR
sakal
कोल्हापूर
Kolhapur News: तपासणी न करताच दिला दिव्यांग दाखला, सीपीआरमध्ये धक्कादायक प्रकार
Kolhapur CPR: कोणत्याही डॉक्टरांनी तपासणी न करता एका शिक्षकाला दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले असून जिल्हा शल्यचिकित्सकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना कळविले.
कोल्हापूर: कोणत्याही डॉक्टरांनी तपासणी न करता, त्यांचे मत न घेता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका शिक्षकाला दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाली आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना कळविले असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.

