

Kolhapur CPR Hospital Scam
esakal
Kolhapur Hospital Corruption Expose : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयालयात (सीपीआर) शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी कोणाला किती रुपये दिले याची नोंद असणाऱ्या लाल रंगाच्या वहीत पाच महिन्यांत ‘मॅडम’ना सहा लाख ९१ हजार रुपये तर,‘सरां’ना ऑगस्ट ते सप्टेंबर या तीन महिन्यांत पाच लाख रुपये दिल्याची नोंद आहे. त्यामुळे लाखो रुपये घेऊन सेवा करणाऱ्या या मॅडम आणि सर कोण? याचा आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनाच शोध घ्यावा लागणार आहे.