Kolhapur CPR Scam : सीपीआरमध्ये शिवसेनेचे स्टिंग ऑपरेशन; उघड झाले वैद्यकीय बिलांच्या लाखो रुपयांच्या व्यवहारांचे गुप्त हिशेब
Shiv Sena Sting Opreaion Reveals : सीपीआर रुग्णालयातील फाईल मंजुरीसाठी सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांची लाल वही सापडताच शिवसेनेने घेतले डॉ. वाडीकर यांना धारेवर
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी सुरू असलेल्या खाबुगिरीचा भंडाफोड शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला.