esakal | सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे नदीवेस नाका परिसरात घडली.

बोलून बातमी शोधा

किरकोळ वादातून नातवानेच घातला आजीच्या डोक्‍यात पाटा; इचलकरंजीत घटना
किरकोळ वादातून नातवानेच घातला आजीच्या डोक्‍यात पाटा; इचलकरंजीत घटना
sakal_logo
By
स्नेहल कदम

इचलकरंजी (कोल्हापूर) : किरकोळ वादातून नातवाने आजीच्या डोक्‍यात दगडी पाटा घालून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सखुबाई तुकाराम सादळे (रा. चावरे गल्ली, इचलकरंजी) असे वृद्धेचे नाव असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे नदीवेस नाका परिसरात घडली. याप्रकरणी किरण चंद्रकांत सादळे (चावरे गल्ली) याच्यावर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वेल्डिंग काम करणारा सागर सादळे नदीवेस नाका परिसरातील चावरे गल्लीत राहतात. त्यांच्या आजी सखुबाई आणि किरण सादळे यांच्यात घराजवळ कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद झाला होता. मंगळवारी पहाटे सखुबाई सादळे अंघोळीसाठी गरम पाणी घेण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर त्याच कारणातून किरण हा सखुबाई यांच्याशी वाद घालू लागला. या वेळी किरणने धक्काबुक्की करत सखुबाई यांना खाली पाडून सिमेंट पत्र्याच्या तुकड्याने मारहाण केली. त्यानंतर सखुबाई यांच्या डोकीत व हातावर दगडी पाटा घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सागर सादळे याच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून किरण सादळे याला अटक झाली आहे.