esakal | कोल्हापूर - अपार्टमेंटवरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

महिला खाली पडली, तिने उडी मारली की तिला कोणी ढकलले? याबाबत नागरिकांकडून तर्कवितर्क काढले जात होते.

कोल्हापूर - अपार्टमेंटवरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजारामपुरी 11 व्या गल्लीत भरदुपारी ही घटना घडली आहे. तशी या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी राजारामपुरी पोलिस दाखल झाले. त्यांनी संबंधित महिलेची ओळख पटवण्यापासून तपासाचे काम सुरू केले.

हेही वाचा: हौसेला मोल नसतं; गायीच्या डोहाळे जेवणाची पंचक्रोशीत चर्चा

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरी ११व्या गल्लीतील तवणाप्पा पाटणे हायस्कूल रोडवर एक तीन मजली अपार्टमेंट आहे. याच्या दुसऱ्या मजल्यावर असणारी एक महिला दुपारी सुमारे वीस ते तीस फुट खाली पडली. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे हे पथकासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह सीपीआरला पाठवला. महिला खाली पडली, तिने उडी मारली की तिला कोणी ढकलले? याबाबत नागरिकांकडून तर्कवितर्क काढले जात होते. येथे आयुर्वेदिकच्या नावाखाली मसाज पार्लर सुरू असल्याबाबतची चर्चा परिसरात सुरू होती. संबंधित महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. दोन महिला या प्रकरणी तिघांकडे पोलिस चौकशी करीत आहेत.

हेही वाचा: कोकणकर काळजी घ्या! पुढील 24 तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस

फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही

ज्या फ्लॅटमधून महिला खाली पडली, त्या फ्लॅटमध्ये कडाकण्या करण्याचे काम सुरू होते. या फ्लॅटमध्ये दोन बेडरुम असून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

loading image
go to top