
Kolhapur Crime : आसरानगर परिसरात जुन्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांनी भरदिवसा एकावर जीवघेणा हल्ला केला. रस्त्यावर अडवून दगडांनी डोकीवर व चेहऱ्यावर मारहाण केल्याने पृथ्वीराज विजय जाधव (वय २२ रा. शहापूर) हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेतानाही संशयित आरोपींनी रस्त्यावर अडवून पुन्हा एकदा मारहाण केली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी रविकांत चंद्रकांत घोलकर (वय ३२) आणि अमोल ऊर्फ रवींद्र शिवाजी कामते (वय २५ दोघे रा. आसरानगर) या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.