esakal | कोल्हापुरात मिरचीचा तडका
sakal

बोलून बातमी शोधा

crowd of Chili purchasing in kolhapur market

लॉकडाऊनमुळे मिरची बाजारात आणणे शक्‍य झाले नव्हते. दोन दिवसात कर्नाटकातून ब्याडगी मिरचीचे खूप ट्रक लक्ष्मीपुरीत आले. आजही हे ट्रक लक्ष्मीपुरी धान्य बाजारात उभे होते.

कोल्हापुरात मिरचीचा तडका

sakal_logo
By
अमोल सावंत

कोल्हापूर : तब्बल दिड महिन्यानंतर शहरात लाॅकडाऊनमधून थोडी शिथिलता देण्यात आली. या शिथिलतेनंतर काल शहरात मिरच्या, मसाले घेण्यासाठी लक्ष्मीपुरीत प्रचंड गर्दी झाली होती. लॉकडाऊन संपले. चला...! आता बाजारात जाऊ या. खरेदी करु या, अशा थाटात अनेकजण घराबाहेर पडले. दुचाकीनरून दोघे-तिघे बसून खरेदीचा आनंद घेण्यासाठी आले होते. सोशल डिस्टिन्सिंग म्हणजे काय रे भाऊ, अशी विचारण्याची सोय नव्हती. प्रत्येकजण मिरची घेण्यासाठी झुंबड करुन एकत्र आले होते. अनेकांकडे मास्क नव्हते. लक्ष्मीपुरीत तर अक्षरश: लोकांना उभा राहायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दीा झाली होती. मिरचीच्या दुकानांसमोर खेटून उभे राहून मिरची घेत होते. तर इकडे गाड्यांच्या रांगा आणि माल वाहतूकीच्या गाड्यांनी ट्रॅफिक जाम झाले होते. पोलिस नावाला गाड्या बाजूला करा, असा केविलवाणा आदेश देत होते; पण खरेदीचा आनंदच इतका मोठा होता की, कोरोना संपला, अशा अविर्भावात खरेदी केलेली मिरच्याची पोती घेऊन घरी जात होते.

मे महिन्यात चटणी करण्याची घाई असते. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट इतकं मोठे आहे की, लोकांना बाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने प्रशासन करत आहे; पण मानतील ते लोक कसले? ते काल सकाळी लवकर घराबाहेर पडले. बरोबर मित्रांना, घरातील अन्य सदस्यांना एकाच गाडीत घेतले. काहींनी दुचाकीवरून तर काहींनी चार चाकीतून खरेदीसाठी बाहेर पडले होते. या सर्व गाड्या लक्ष्मीपुरीत कशाही पद्धतीने लावून मिरच्या घेण्यासाठी झुंबड केली होती. खरेतर लॉकडाऊनमुळे एक ते दिड महिना मिरचीची विक्री झाली नाही. यामुळे मिरचीचे दरही वाढले आहेत. दर वाढले तरी चटणी करायची म्हणून अनेकांनी चढ्या दरानेच मिरची खरेदी केली. 

24 मे रोजी सुर्याचा रोहीणी नक्षत्रात प्रवेश होतो. त्याआधी वातावरण बदलण्यास सुरवात होते. काही ठिकाणी हलकासा तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडतो. वातावरणात आर्द्रता वाढत असते. मिरचीला हे वातावरण योग्य नाही. आता उन जास्त असल्यामुळे मिरची तयार असते. मिरची बरोबर लक्ष्मीपुरीत मसाला विक्रेते भरपूर आहेत. मिरचीच्या दुकानासमोरच मसाले विक्रेते असतात. मिरची घेतली की, बरोबर मसालेही अनेकांनी घेतले. मिरची घेण्यासाठी शहराबरोबर उपनगरे, आजूबाजूची गावातील लोक आल्याने गर्दी वाढलेली दिसली. 

हे पण वाचा - दिलासादायक : इचलकरंजीतील 'तो' चार वर्षांचा बालक झाला कोरोना मुक्त.... 


मिरची आणि मसाल्याचे दर (प्रतिकिलो रुपये) 

ब्याडगी (300/450), गुंटुर (200/250), लवंगी (250/300), काश्‍मिरी (450/480), संकेश्‍वरी जवारी (1100/1600), आल्लं (80), लसूण (100 ते 120), पांढरा कांदा (30). 

हे पण वाचा - कुटुंब नियोजनावर असा झाला आहे कोरोनाचा परिणाम!

 


मिरचीची आवक जास्त 

लॉकडाऊनमुळे मिरची बाजारात आणणे शक्‍य झाले नव्हते. दोन दिवसात कर्नाटकातून ब्याडगी मिरचीचे खूप ट्रक लक्ष्मीपुरीत आले. आजही हे ट्रक लक्ष्मीपुरी धान्य बाजारात उभे होते. प्रत्येक ठिकाणी मिरचीचे पार्सल व्यापारी घेत होते. तुलनेने गुंटूर मिरची ही आंध्रप्रदेशातून इथे येते. दिड महिन्यापासून आंध्रप्रदेशातून गुंटुर ही मिरची कमी प्रमाणात आलेली आहे. संकेश्‍वरी मिरचीचा 1100 ते 1600 रुपये प्रतिकिलोचा दर पाहिला तर अनेकांनी ही मिरची घेणे टाळले. 

""आता विविध प्रकारच्या मिरची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही आवक राहील. पाऊस सुरु झाला की, लोक मिरची घेत नाहीत. राहीलेली मिरची ही दिवाळीनंतर अनेकजण घेतात. मिरची घेण्यासाठी लोकांची गर्दीही वाढत आहे.'' 

- सुरज हळदे, मिरची व्यापारी

कोल्हापुरातील प्रेत्येक घटना घडामोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top