esakal | कोल्हापुरात 3336 हेक्‍टरवरील पिकांना वादळी पावसाचा तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

cyclone and heavy rain causes 3336 hectare land damaged in kolhapur this year various crops also damaged

जिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना यंदाची दसरा -दिवाळी नुकसानीची ठरली आहे. 

कोल्हापुरात 3336 हेक्‍टरवरील पिकांना वादळी पावसाचा तडाखा

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे नूकसान मोठे नुकसान झाले आहे. 10 ते 16 ऑक्‍टोबर दरम्यान, तब्बल 3 हजार 336 हेक्‍टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना यंदाची दसरा -दिवाळी नुकसानीची ठरली आहे. 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात 33 टक्केपेक्षा जास्त नूकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसिलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत. जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यात सर्वाधिक 1200 हेक्‍टर क्षेत्राचे आणि 13 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्‍यातही भात, सोयाबीन व ऊस जमिनदोस्त झाला आहे. 

हेही वाचा - 'महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारणीसाठी केंद्र सरकारतर्फे प्राधान्याने सहकार्य करु' -

आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मूसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व असलेले भात आणि सोयाबीनचा अक्षरश: चिखल झालेला पहायला मिळत आहे. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्‍यात अनेक ठिकाणी परिपक्व झालेले भात पिक शेतात साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. यामुळे, भात भिजून कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमूगाचीही आहे. जिल्ह्यात अजूनही पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात नुकसान झालेली पिकांचे गाव, शेतकरी निहाय संख्या - (पिकांच्या नुकसानीची आकडेवाडी हेक्‍टरमध्ये) 

गावे                       404
शेतकरी संख्या     24951
भात                      1970
ऊस                       556
भुईमूग                    296
सोयाबीन                   95
भाजीपाला                225
ज्वारी                       10 
फुलपिके                  30
उडिद                       2 
नाचणी                   163
इतर                        66
एकूण                    3336

हेही वाचा - नवरात्रोत्सवात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवारीही सुनासुनाच -

"जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये सर्व पिकांचे 3336 हेक्‍टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही."

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 

संपादन - स्नेहल कदम 
 

loading image