
शनिवारी प्रवेश यादी होणार प्रसिद्ध
महाविद्यालयांची प्रवेश यादी होणार जाहीर मात्र दीड हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग २ भरण्याची मुदत आज संपली. १२,८९८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. १४,४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १,५३५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरलेला नाही. गुणानुक्रमे महाविद्यालयांची प्रवेश यादी शनिवारी (ता.५) जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश घेणे सुरू होईल.
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली. अर्ज भरण्यापासून ते सर्व कागदपत्रे जोडणे, प्रवेश शुल्क हे सर्व यंदा ऑनलाईन होते. यंदा दहावीचा निकालाची टक्केवारी अधिक असल्याने यंदा कटाउट जास्त लागणार हे निश्चित असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे.
हेही वाचा-योजना बंद मात्र कर घेणे सुरूच ; फेर सर्वेक्षण गरजेचे
अर्ज भरण्याचा पहिला भाग १४ हजार ४३३ जणांनी भरला. त्यापैकी १ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला नाही. १२ हजार ८९८ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित करण्यात आले. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक आहे. ६,९१४ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी अर्ज केले आहेत. अर्जची गुणप्राधान्य क्रमाने छाननी होऊन शनिवारी (ता.५) महाविद्यालयांची कटऑफ लिस्ट लागणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्चिती केली जाईल.
हेही वाचा- गरज ‘अर्थ’प्रबोधनाची!
शाखानिहाय अर्ज
कला शाखा (इंग्रजी माध्यम) - ८३
कला शाखा (मराठी माध्यम) - १७०४
वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) - २३६१
वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) - १८३६
विज्ञान शाखा - ६९१४
एकूण - १२,८९८
शाखानिहाय जागा
कला शाखा (इंग्रजी माध्यम) - १२०
कला (मराठी माध्यम) - ३६००
वाणिज्य (मराठी माध्यम) - ३३६०
वाणिज्य (इंग्रजी माध्यम) - १६००
विज्ञान - ६०००
एकूण - १४,६८०
संपादन - अर्चना बनगे
Web Title: Deadline Filling Part 2 Eleventh Admission Process Applications
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..