esakal | जर्मन शेफर्डला डिमांड; 'या' भागात जोरात त्याचीच चलती

बोलून बातमी शोधा

जर्मन शेफर्डला डिमांड; 'या' भागात जोरात त्याचीच चलती
जर्मन शेफर्डला डिमांड; 'या' भागात जोरात त्याचीच चलती
sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल (कोल्हापूर) : मेंढपाळांना बकऱ्यांसोबत घोडा व कुत्रे हे जवळचे प्राणी आहेत. ओझी वाहण्यासाठी घोडी व बकऱ्यांची राखण करण्यासाठी कुत्रा पाळला जातो. यासाठी स्थानिक जातीच्या व केसाळ कुत्र्याला विशेष मागणी असते. पण अलिकडे या कुत्र्यांची जागा जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांनी घेतली आहेत. कागल शहर व परिसरातील बहुतांश मेंढपाळांकडे जर्मन शेफर्ड जातीची कुत्री आहेत. या कुत्र्यांच्या मागणीत अलिकडे वाढ होत आहे.

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी अनेक वर्षापासून केला जातो. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या सुमारे 400 जाती आढळून येतात. या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन 600 ग्रॅम पासुन ते अगदी 100 किलोपर्यंतही असते, तर उंची 8 इंचांपासून 4 फुटांपर्यंत असते.

हेही वाचा- ''गोकुळ हाती दिल्यास माता-भगिनींना सोन्या-नाण्याने मडवू"

कुत्रा हा पुरातनकाळापासून माणसांच्या सानिध्यात राहिला. तसेच रानावनात फिरताना बकरी एकत्र करणे व रात्री त्यांचे रक्षण करण्यासाठी कुत्र्यांचा वापर मेंढपाळ लोकांकडून केला जातो. कुत्र्याची हुशारी, समजूतदारपणा आणि आज्ञाधारकपणा या गुणांमुळे कुत्रा मानवाचा तसेच मेंढपाळांचा जवळचा मित्र बनला आहे. याअगोदर स्थानिक जातीच्या व केसाळ कुत्र्याला मेंढपाळांकडून विशेष मागणी होती. पण अलिकडे या गावठी कुत्र्यांची जागा जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांनी घ्यायला सुरवात केली आहे.

जर्मन शेफर्ड कुत्रे स्थानिक जातीच्या कुत्र्यापेक्षा सरस असल्याचे मेंढपाळांचे मत आहे. शिवाय स्थानिक जातीची कुत्री काही वेळा कळप सोडून बाजूला जातात. चुकतातही. अशा वेळी पुन्हा लहान पिल्लू घ्यायचे, त्याला मोठे करायचे त्यानंतर ते उपयोगी पडते. याला सहा महिने लागतात. मात्र जर्मन शेफर्ड कुत्रे चुकत नाही. बकरी अडविण्याच्या कामात दोन माणसांचे काम एकटे कुत्रे करते. या चांगल्या गुणामुळे गावठी पेक्षा जर्मन शेफर्ड सरस ठरत असल्यामुळे जर्मन शेपर्ड कुत्र्याला मेंढपाळांकडून मागणी वाढत आहे.

गेल्या दोन तीन वर्षापासून कागलमधील मेंढपाळांकडे जर्मन शेफर्ड जातीची कुत्री पाळली जात आहे. स्थानिक जातीच्या कुत्र्या पेक्षा त्याचा उपयोग चांगला आहे. त्यामुळे त्याची मागणी वाढत आहे.

- भाऊसो बोते, जर्मन शेफर्ड पालक

Edited By- Archana Banage