Jayasingpur Dentist : पाठीवरील बॅगेत दगड, विटा भरल्या... मित्र परिवारातील अनेकांना शेवटचा संदेश पाठवला... राजाराम तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून ‘सुसाईड नोट’ लिहिली आणि पाण्यात उडी घेत त्यांनी जीवन संपवले..कौटुंबिक नैराश्येतून अवधूत प्रकाश मुळे (वय ३५, रा. जयसिंगपूर, ११ वी गल्ली) यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. या आत्महत्येने जयसिंगपूरमध्येही अनेकांना धक्का बसला. अवधूत हे दंतचिकित्सक म्हणून परिचित होते. आज सायंकाळी सहाच्यासुमारास अग्निशमन दल व रेस्क्यू पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे आणला..अवधूत मुळे यांची दुचाकी आज सकाळी राजाराम तलावाच्या काठावर आढळून आली. या दुचाकीवर एक चिठ्ठीही होती. ही चिठ्ठी फिरायला येणाऱ्या लोकांना दिसताच त्यांनी राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही याची खातरजमा करण्याचे काम सुरू केले होते. अवधूत मुळे यांनी शुक्रवारी रात्रीच जयसिंगपुरातील अनेकांच्या मोबाईलवर आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज पाठवला होता. यामध्ये ‘आपण पाठीवरील बॅगेत दगड भरून राजाराम तलावात उडी घेत आहे. त्यामुळे मृतदेह पाण्यावर यायला उशीर लागेल’ असे लिहिल्याचे काहींनी सांगितले..Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला.मुळे यांचे नातेवाईक मित्रही आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनीही राजाराम तलावाच्या परिसरात पोहोचून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू पथक, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास अवधूत यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.