अजित पवारांच्या दौऱ्यात बदल; सांगलीकडे रवाना

ajit pawar
ajit pawarsakal media
Updated on

कोल्हापूर: ढगाळ हवामानामुळे हेलीकॉप्टर उतरू शकत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर ऐवजी सांगलीकडे रवाना झाले. कोल्हापूर आणि शिरोळ या ठिकाणी पूरस्थीतीची पाहणी करण्यासाठी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात येणार होते. त्यानंतर ते सांगलीकडे रवाना होणार होते. मात्र हेलीकॉप्टर उतरु न शकल्यामुळे ते आता सुरुवातीस सांगलीकडे रवाना झाले आहेत.(Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-visit-in-Kolhapur-flood-latest-news-akb84)

कोल्हापुरात महापूराने हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे पाण्यात गेली आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पूरस्थीतीचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी कोल्हापुर आणि शिरोळ येथील पूरग्रस्थाना भेटून माहिती घेणार होते. मात्र हवामान बदलामुळे त्यांनी पूर्वनियोजीत कार्यकाम बदलला.

त्यांचा पूर्वनियोजीत दौरा अला होता

आज सकाळी 9 वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 9.15 ते 10 वाजेपर्यंत पूरग्रस्त परिसर पाहणी- शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट. शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी. 10.15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) बैठकीनंतर कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. 11.30 वाजता हेलिकॉप्टरने श्री. दत्त शेतकरी सहकार साखर कारखाना लि. हेलिपॅड, ता. शिरोळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शिरोळ परिसर पूरग्रस्त पाहणी करुन दुपारी 1.15 श्री. दत्त शेतकरी सहकार साखर कारखाना लि. हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने सांगलीकडे प्रयाण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhose Khind Murder Case
Panhala Pavan Khind Trek kolhapur
Kolhapur ATS investigation Pakistan links
Kolhapur flood situation latest news today
Marathi News Esakal
www.esakal.com