
Maratha Protest Kolhapur
esakal
Maharashtra Reservation News : ‘ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच आहेत, अशा नोंदी असून, मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आता पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात १ ऑक्टोबरला खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून कायदेशीर लढाई केली जाणार आहे’, अशी माहिती बाबा इंदुलकर व दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. तुळजाभवानी मंदिरात दुपारी बारा वाजता पूजन केले जाणार आहे.