
Satej Patils Appeal Rahul Patil : करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून राजकारण करणाऱ्या माजी आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा आज केली. सोमवारी (ता. २५) सडोली खालसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पी. एन. पाटील यांना मानणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांसह आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.