Devendra Fadnavis Birthday : देवेंद्र फडणवीसांचा बांधावर वाढदिवस साजरा; शेतमजुरांनी दिली अनोखी भेट

'हा' उपक्रम संपुर्ण शिराळा मतदार संघात राबवण्यात येणार
Devendra Fadnavis Birthday
Devendra Fadnavis BirthdaySakal

नेर्ले - वाळवा शिराळा भागात सद्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शेतकरी शेतमजुरांच्या लगबग सुरू आहेत.भात,ऊस,मका,सोयाबीन ,भुईमूग या पिकांची लावण व टोकण्या सुरू आहेत.

लगबगीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना "प्लास्टिक च्या खोळ" भेट देत एक वेगळा उपक्रम साजरा केला.महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते सम्राट महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला.

शिराळा मतदार संघात विविध उपक्रमांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक यांनी शेतकऱ्यां सोबत बांधावर जाऊन केक कापला. वाढदिवसाचे बॅनर-पोस्टर न लावता फडणवीस यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्यात आला.

Devendra Fadnavis Birthday
Mumbai Heavy Rains: मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय! अंधेरी सबवे बंद, 12 हून अधिक मार्गांवर बसेस वळवल्या

या निमित्त मतदार संघांतील शेतकरी, कष्टकरी,यांना पावसापासून बचाव व्हावा या साठी प्लास्टिकची खोळ वाटप करण्यात आली. विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमांची सुरूवात नेर्ले गावातून झाली.

हा उपक्रम संपुर्ण शिराळा मतदार संघात राबवण्यात येणार आहे. यावेळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतिश पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक गिरीष पाटील, पांडूरंग पाटील, सरगम मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Birthday
Mumbai : ठाणे,रायगड,पालघर जिल्ह्यातील नदीच्या पाणी पात्रात वाढ; नद्यांनी इशारा पातळी गाठली

महाडिक कुटुंबाकडून नेहमीच विधायक कामांना प्राधान्य दिले जाते.शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमजूराना सम्राट यांचेकडून मिळालेली ही भेट पाहून महिलांसह सगळे भारावून गेले.यावेळी सम्राट महाडिक यांनी शेतीच्या मशागती बाबत माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com