

कोल्हापूरच्या फळबाजारात देवगड हापूस आंबा दाखल झाला असून, व्यापाऱ्यांनी एका डझनाचा दर जाहीर केला आहे.
esakal
Kolhapur Market Mango : शाहू मार्केट यार्डमधील जेबी अँड सन्स फळ विभाग गाळा नंबर सहा यांच्या दुकानात प्रकाश शिरसेकर यांच्या देवगड हापूस आंब्याची आवक आज झाली. त्यात एक डझनाचे पाच बॉक्स होते. त्याचा सौदा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते झाला.