
-निवास मोटे
जोतिबा डोंगर : डोक्याला भगवी शाल . अंगात शर्ट पॅट .. अंगाला खरचट .. दुखापत होऊ नये . .पोत्याचे बारदान शिवून केलेला घात कोट .. त्याच्या तोंडात केवळ जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष .. ४५ वयाचा अंगाने सडपातळ एक भक्त चक लोटांगण ( आडवे झोपून गोल फिरणे ) घालत ९५ किलोमीटर अंतरावर प्रवास करत आज सकाळी साडे अकरा वाजता जोतिबा डोंगरावर दाखल झाला. सुरेश मुळीक शाळगांव ता. कडेगाव जि सांगली असे या भक्ताचे नांव आहे.