
Ambabai Temple Kolhapur
esakal
अंबाबाई देवीची महाविद्या श्रीबगला माता पूजाः
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्रीबगला माता रूपात सालंकृत पूजा श्रीपूजक अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी व नितीन सांगवडेकर यांनी बांधली.
भाविकांची उपस्थिती व दर्शनः
पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत १,७८,२०७ भाविकांनी दर्शन घेतले. पावसामुळे गर्दी तुलनेने कमी होती. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात गजारूढ रूपात पूजा झाली व रात्री पालखी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती होती.
विशेष कार्यक्रम व पाहुण्यांची उपस्थितीः
शिवशक्ती तरुण मंडळातर्फे कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन झाले. दिवसभरात सुप्रिया सुळे, संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवाजी पाटील, आमदार राजू खरे, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका माने यांनी दर्शन घेतले. दर्शनरांगा तुरळक असल्याने भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळाले.
Devotees at Ambabai Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्रीबगला माता रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक अजित ठाणेकर, श्रीनिवास जोशी व नितीन सांगवडेकर यांनी ही पूजा बांधली. दरम्यान, पहाटे चार ते रात्री आठपर्यंत १ लाख ७८ हजार २०७ इतक्या भाविकांनी दर्शन घेतले. यंदा नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर लगेचच भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. यंदा मात्र पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची संख्या तुलनेने कमी आहे.
दरम्यान, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची गजारूढ रूपात पूजा बांधली होती. रात्री देवीच्या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी गर्दी केली. देवीची पालखी पुष्पवृष्टी आकारात सजविण्यात आली. यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.