esakal | विरोधक गोकुळला राजकारणाचा अड्डा करतील; धनंजय महाडिक यांचा घणाघात

बोलून बातमी शोधा

null

विरोधक गोकुळला राजकारणाचा अड्डा करतील; धनंजय महाडिक यांचा घणाघात

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचे ब्रॅंड आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे उमेदवारांची झोळी मतांनी तुंडूंब भरणार असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले. तर विरोधकांचा गोकुळमध्ये राजकारणाचा अड्डा होवू नये, यासाठी निवडणूकीपासून त्यांना लांब ठेवले पाहिजे, अशी टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणूकीत राजू शेट्टी यांनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाडिक म्हणाले, राजू शेट्टी हे राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे बरे-वाईट समजते. शेट्टी हे शेतकऱ्यांचे ब्रॅंड आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली असून त्याचा फायदाही झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांनी शाहू आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोकुळ निवडणूकीत त्यांची जादू दिसणार आहे.

हेही वाचा: गोकुळ रणांगण; 'पाहुणचार केला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही'

पुढे म्हणाले, गोकुळची निवडणूक वेगळ्या विषयाकडे नेली जात आहे. राज्यात नव्हे तर देशातील नावाजलेला संघ म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. अपेक्षित नसताना गोकुळची निवडणूक लागली आहे. विरोधकांना काहीही करुन गोकुळची सत्ता हवी आहे. मात्र, तो त्यांचा राजकारणाचा अड्डा होण्याआधीच त्यांना घरी बसवले पाहिजे. विरोधक चांगला सुरु असलेला संघ मोडून खातील. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता सत्य आणि असत्याची लढाई आहे. दूध उत्पादकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. त्यांचा कौल सत्तारुढ पॅनेला आहे. येणाऱ्या 2 तारखेला हे समजणार आहे. यावेळी माजी आमदार सजंय घाटगे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक उपस्थित होते.

सत्तारुढ पॅनेल 400 मतांनी विजयी होईल : महाडिक

विरोधक म्हणतात आमचा विजय झालेला आहे. आता केवळ अध्यक्ष निवड करायची बाकी आहे. पण, सत्तारुढच्या व्यासपीठावर असलेले माजी खासदार राजू शेट्टी, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व इतर लोकांकडे पाहिले, तर 2 तारखेला गोकुळचा निकाला काय असणार हे आत्ताच सांगू शकतो. हे कोणत्याही ज्योतिषाला विचारायची गरज नाही. 400 ते 500 मतांनी सत्तारूढ पॅनेल विजयी होणार असल्याचेही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

हेही वाचा: '...तर सरकारमधून बाहेर पडू'