कोल्हापूरला पोहोचण्याआधीच महाडिकांचा पाटलांना इशारा

राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत
कोल्हापूरला पोहोचण्याआधीच महाडिकांचा पाटलांना इशारा
Summary

राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपच्या धनंजय महाडिक यांनी राज्यसभेचं मैदान मारल्यानंतर आज ते कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरात त्यांच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरु असून ही मिरवणूक अंबाबाई मंदिरात जवळ संपणार आहे. दरम्यान, जिल्ह्याकडे येत असताना धनंजय महाडिक यांनी कराडमध्येच पालकमंत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

या वक्तव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. धनंजय महाडिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पुरेसं संख्याबळ असल्यानेच मला उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा मुद्दा येत नाहीत. आमदार काही विकावू नाहीत. राज्यसभेला गुप्त मतदान पद्धत नसतानाही भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीवरूनही महाविकास आघाडी सरकारला जाहीर इशारा दिला.

कोल्हापूरला पोहोचण्याआधीच महाडिकांचा पाटलांना इशारा
पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक, प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला

ते म्हणाले संघर्ष महाडिकांच्या पाचवीलाच पुजला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार 2019 मध्ये अस्तित्वात आलं असलं, तरी हे तिन्ही पक्ष महाडिकांविरुद्ध कोल्हापूर लढल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार खासदार नाही, महापालिकेत सत्ता नाही, जिल्हा परिषदेत सत्ता होती, पण ती आता नाही. महाडिकांचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि पुढील 100 वर्ष राहिल असे सांगत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना एकप्रकारे जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे.

आज सायंकाळी 4 वाजता खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरमध्ये आगमन होणार असून मागील अनेक पराभवानंतर महाडिक कुटुंबात विजय झाल्याने जल्लोषी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यांची प्रमुख मार्गाने मिरवणूक काढून सांगता अंबाबाई मंदिरात सांगता होईल. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा असणार आहेत. माजी आमदार महादेवरावर महाडिक यांनी सुद्धा मुन्नाची मिरवणूक बघाच, असा सूचक इशारा काल दिला होता.

कोल्हापूरला पोहोचण्याआधीच महाडिकांचा पाटलांना इशारा
तारीख नव्हे, निकालच! शिवाजीनगर पुलाचा जुलैत मुहूर्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com