Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी ‘थेट पाईप’ व्यवस्था बंद करण्यात आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा संपल्याने हा निर्णय घेण्यात आला असून शहराच्या पाणी व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होणार आहे.
Kolhapur Municipal Corporation Water Supply close

Kolhapur Municipal Corporation Water Supply close

esakal

Updated on

Kolhapur Drinking Water News : पावसाने दिलेली ओढ व काळम्मावाडी धरणातील कमी झालेली पाणीपातळी यामुळे तेथील थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद झाला आहे. त्यामुळे पुन्हा पर्यायी शिंगणापूर योजना सुरू केली आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर या पर्यायी योजनेतूनही पाणी उपशाला मर्यादा येणार असून, पाणी कपातीचे संकट शहरवासीयांच्या डोक्यावर घोंगावू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com