
Jabbar Patel: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा यंदाचा 39 वा शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू स्मारक इथं एका शानदार कार्यक्रमात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार जब्बार पटेल यांना प्रधान करण्यात आला. रोख रक्कम एक लाख रुपये, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप होतं.
या कार्यक्रमांमध्येच जब्बार पटेल यांनी पुरस्कार स्वरूपात मिळलेली एक लाख रुपयांची रक्कम ही बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांना विभागून दिली. यावेळी जब्बार पटेल यांनी राजर्षी शाहूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शाहू मेमोरियल ट्रस्टसाठी पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन जिल्हा नियोजन मंडळातून देण्याची घोषणाही केली.