
महिलेने लावली थेट मंडल अधिकाऱ्याच्या कानशिलात
हातकणंगले : नांव लावण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने हातकणंगले येथील मंडल अधिकाऱ्याला थेट त्याच्या कार्यालयातच कानफाटात लावल्याची घटना येथील मंडल अधिकारी कार्यालयात घडली. याबाबत दोन्ही बाजूनी परसर विरोधी तक्रारी हातकणंगले पोलिसांत दाखल झाल्या आहेत.प्रभारी मंडल अधिकारी गौरव कनवाडकर रा.फडणीसवाडा कुरूंदवाड (ता . शिरोळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित माहिला पद्मजा इंगवले (व.व.३५ ) रा. गांधीपुतळा इचलकरंजी. हिच्यावर शासकीय कामांत अडथळा केल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीसात दाखल झाला आहे. तर सौ. पद्मजा इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गौरव कनवाडकर यांच्या विरोधात एक लाख रूपये व शरीरसुखाची मागणी केल्याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.
अधिक माहीती अशी, आज सकाळी सौ. इंगवले या त्यांचा भाऊ राजकुमार पोपट जगताप याचे हातकणंगले येथील गट क्र.१११३ /ब/१ /१ मधील नांव कशाच्या आधारे कमी केले याबाबतची विचारणा करण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालयात गेले असता कनवाडकर याने नांव लावायचे असेल तर एक लाख रुपये दे नसल्यास शरीरसुखाची मागणी केल्याचे सौ.इंगवले यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.तसेच मी सरकारी कर्मचारी आहे तुला अशी धमकी दिल्र्यचेही या फिर्यादीत नमूद आहे.
तर मंडल अधिकारी गौरव प्रभाकर कनवाडकर ( व.व.३९ ) यांनी सौ. पद्माजा इंगवले व राणी राहूल सोनवणे रा. सांगली फाटा इचलकरंजी या दोघीच्या विरोधात दिलेल्य फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. इंगवले यांनी त्यांचा भाऊ राजकुमार जगताप याचे नांव कसे कमी झाले म्हणून वाद घातला आणि सुरू असलेल्या कामात अडथळा करत डाव्या व उजव्या कानशीलात मारल्याचे या फिर्यादित म्हटले आहे.
दरम्यान याबाबात हातकणंगले व शिरोळ तालुका मंडल अधिकारी व तलाठी संघटनेने हातकणंगले तहसिलदार यांना निवेदन देऊन गौरव कनवाडकर यांच्यावर हल्ला करत शासकीय कामात अडथळा निर्माण केलेल्या संबधित महिलेवर गुन्हा नोंद करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की संबधित सौ. पद्मजा इंगवले ही सराईत गुन्हेगार असून तिच्या नावे हुपरी व गावभाग इचलकरंजी येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत सहानुभूती मिळविण्यासाठी तिने खोट्या तक्रारी दाखल केल्या असून याबाबत सखोल चौकशी व्हावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
Web Title: Dispute Over Naming Woman Directly Attacked The Mandal Officer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..