esakal | 'राजकारणात मते फोडता येतात, ती फोडून शिवसेनेची ताकद दाखवून द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena

गोकूळमध्ये एका शिवसैनिकाला डावलले गेले तर आम्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पॅनेल उभा करत आहोत

'जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार'

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शिवसैनिक सहकारात आहेत. शिव सहकार सेनेच्या माध्यमातून शिवसेना सहकारातील आपली ताकद दाखवेल. म्हणूनच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शिवसेना स्वतंत्र पॅनेल बनवून स्वबळावर लढवणार आहे. बँकेमध्ये संचालक असणाऱ्या सेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनाही याच पॅनेलमधून निवडणूक लढवावी लागेल, असे विधान शिव सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमूख प्रदीपकुमार खोपडे यांनी केले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या सेनेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिव सहकार सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देण्यात आले.

यावेळी खोपडे म्हणाले, ‘सहकारात शिवसेना नाही असा गैरसमज आहे. शिवसैनिक अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत. मात्र त्यांची बांधणी झालेली नाही. ते स्थानिक गटातून पदाधिकारी झाले आहे. सहकारात शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठीच आता शिव सहकार सेनेच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही आम्ही स्वबळावरच लढवणार आहोत. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात जे शिवसैनिक आहेत. त्यांनाही शिव सहकार सेनेच्या पॅनलमधूनच निवडणूक लढवावी लागेल. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा.'

हेही वाचा: जोपर्यंत 'महाविकास'चं सरकार आहे, तोपर्यंत बँकेची चौकशी होणार नाही

पुढे ते म्हणाले, 'सहकारात भाषणापेक्षा सभासदांशी संपर्क करण्यावर भर द्यावा लागतो. मते फोडता येतात. ती फोडा. सहकारामध्ये शिवसेनेची ताकद दाखवून द्या. म्हणूनच ग्रामीण भागात शिवसेनेच्या प्रत्येक शाखा स्तरावर प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या शाखेच्या परिसरातील सहकारी संस्थांच्या सभासदांची मते पक्की केली पाहिजेत. मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवेन. त्यांनी परवानगी घेऊन आपण पॅनेल बनवू. सर्वांनी प्रयत्न केले तर सहकारी संस्थांची निवडणूक सहज जिंकता येईल.’ यावेळी जिल्हा प्रमूख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, सुजीत चव्हाण यांच्यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

गोकूळचा वचपा

गोकूळमध्ये एका शिवसैनिकाला डावलले गेले तर आम्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पॅनेल उभा करत आहोत. यावरून आता सहकारातील परिवर्तन नक्की असल्याचे दिसते. गोकूळमध्ये शिवसैनिकावर अन्याय होणार नाही. अशी आशा करतो, असेही खोपडे म्हणाले.

हेही वाचा: कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी

loading image
go to top