Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

Konkan Railway News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून प्रवाशांना आनंदाची भेट! लांब पल्ल्याच्या गाड्या आता काही नवीन स्थानकांवर थांबणार, प्रवास होणार अधिक सोयीस्कर.
Konkan Railway

कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट

esakal

Updated on

Diwali Gift from Konkan Railway : कोकण रेल्वेमार्गावर सिंधुदुर्गात लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस व अजमेर मरू सागर एक्स्प्रेस आणि कणकवली रेल्वे स्थानकावर हिसार-कोयंबतूर एक्स्प्रेस व गांधीधाम नागर कोईल एक्स्प्रेस या चार गाड्यांना थांबा दिला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना ही दिवाळी भेटच मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com