Kolhapur crime news : डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

Kolhapur shocking incident : कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बलात्कार करून आरोपीने व्हिडिओ डिलीट करण्यासाठी १ लाखांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघड. संपूर्ण प्रकरण वाचा.
Kolhapur crime news women doctor rape case

Kolhapur crime news women doctor rape case

esakal

Updated on

Doctor rape case Kolhapur : डॉक्टर महिला घरात एकटी असताना एका ओळखीच्या तरुणाने बलात्कार केला. त्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते महिलेच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर त्याने ते डिलीट करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केली. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन संशयित शक्ती विक्रम भोसले (वय २८, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com