
कोल्हापूर : शेतकरी विरोधी धोरण स्वीकारणाऱ्यांनी आता भारतीय शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी देशातील भांडवलदार व आंतरराष्ट्रीय भांडवलदारांनी युती केली आहे. भारत-अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीस लागणार आहे. शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्पातून शेतकऱ्यांची जमीन ओरबाडून घेतली जात आहे, अशी टीका करत संयुक्त किसान मोर्चा, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती व भूमी अधिकार आंदोलन यांच्यातर्फे बिंदू चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा दहन करताना पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.