जिल्हा परिषद औषध खरेदीप्रश्‍नी बदनामी करू नका

 Don't slander Zilla Parishad drug procurement
Don't slander Zilla Parishad drug procurement

कोल्हापूर, ः कोरोनाच्या औषध खरेदीशी जिल्हा परिषद व पदाधिकाऱ्यांचा काही संबंध नाहीत. तरीही विरोधक सातत्याने जिल्हा परिषदेची बदनामी करत आहेत. अशी बदनामी होऊ नये, अशी विनंतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने विरोधकांना व विशेषत: राजवर्धन निंबाळकर यांना केल्याचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, सभापती डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासणे यांनी स्थायी समितीत झालेल्या विषयांची माहिती दिली. 
श्री. पाटील म्हणाले, ""औषध खरेदीशी जिल्हा परिषदेचा वारंवार संबंध जोडला जातो. काहीच संबंध नसताना आरोप केले जात आहेत. विरोधक म्हणून प्रश्‍न विचारले पाहिजेत, मात्र संस्थेची व वैयक्तिक बदनामी होणार नाही, याचीही खबरदारी घेतली पाहिजे.'' 
अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, ""जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावात तलाव आहेत; मात्र तलावांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे तलावांचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.'' 
तीन वर्षांत एकेका विभागात 30, 30 टक्‍के रक्‍कम खर्च झालेली नाही. डीबीटीमुळे खर्च होत नाही. याची आकडेवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली आहे. डीबीटी रद्दचा ठराव आज झालेल्या स्थायी समितीत केला असल्याचे उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 


सीपीआरबद्दल नाराजी 
सीपीआरमध्ये कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तुलनेत जिल्हा परिषदेच्या कोवीड सेंटरमध्ये कमी डॉक्‍टर्स असताना चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. त्यामुळे सीपीआरमधील उपचारांमध्ये सुधारणा करावी असे सांगतानाच सुरू असलेल्या कामकाजावर आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली. रेमडेसिविर इंजेक्‍शनची रुग्णाला खरंच गरज आहे का, याची खात्री करून ती दिली जावीत. याबाबत तालुक्‍यांना सूचना दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पदाधिकाऱ्यांना राग का? 
औषध खरेदीत घोटाळा झाला आहे. याची कागदपत्रे आहेत. म्हणूनच घोट्याळ्याच्या चौकशीची मागणी करत आहोत. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते याचे उत्तर देतील. जर तुम्ही खरेदी प्रक्रियेत नसाल तर मग तुम्हाला राग का येतो, अशी विचारणा सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केली. 15 व्या वित्त आयोगाच्या खर्चाचे नियोजन दोन महिन्यात होणे आवश्‍यक होते. ते झालेले नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याचे नियोजन करावे, असे पत्र श्री. निंबाळकर यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com