
Drought Impact kolhapur
esakal
परतीच्या पावसाचा फटका – कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, फ्लॉवर, टोमॅटो, भाजीपाला, झेंडू, निशिगंध आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून भात पिकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची चिंता – मागील अतिवृष्टीने आधीच ३६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले होते; परतीच्या पावसामुळे सणासुदीच्या आधी हातातोंडाशी आलेला पैसा हुकल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
धरणे व विसर्ग – जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली असून वारणा, दूधगंगा, पाटगाव, राधानगरी आदी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थितीची शक्यता आहे.
Kolhapur Rain Crop Damage : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. काल रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. सोयाबीन, भुईमूग, फ्लॉवर, टोमॅटो, भाजीपाला यासह फळभाज्यांना मोठा फटका बसला असून, बहरलेल्या झेंडू, गलांडा, निशिगंधाच्या फुलांची झाडे वाकली आहेत. येणाऱ्या दसरा-दिवाळीच्या सणात या पिकांमुळे हातातोंडाशी आलेला पैसा शेतकऱ्यांच्या हाती येणार होता, पण पावसाच्या या अवकृपेने तोच हाती लागण्याआधी निसटणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.