
Nandani Violence Update : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ (नांदणी), येथील "महादेवी" हत्तीला राधे कृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे पाठवत असताना निघालेल्या मिरवणुकीत काल(ता.२८) मोठा गोंधळ उडाला. यावेळी नांदणी (ता. शिरोळ) गावात जमावाने पोलिसांसह वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास १०० ते १२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.