कोल्हापूर : लॉकडाउन सोमवारपासून (ता. 20) सात दिवसांपर्यंत असणार आहे. याचा फायदा घेत भाजीपाला विक्रेत्यांनी अक्षरश: ग्राहकांची लूट केली. एरव्ही सायंकाळी टूकर दर्जाच्या, शिळ्या भाज्यांनाही सोन्याचा भाव आला. भाजीची आवक असूनही विक्रेत्यांनी लॉकडाउनचा फायदा घेत दरवाढ केली. नाईलाज म्हणून ग्राहकांनी ही भाजी खरेदी केली. वांगी अन् टोमॅटोने तर उच्चांक केला. वांगी 100, तर टोमॅटो 80 रुपये किलोला विकण्यात आला. कोथिंबीर बाजारात असूनही 50 रुपयाला पेंडी होती. विक्रेत्यांनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी केली. शहरातील अनेक भाजी बाजारांत सर्व भाज्या दुपारपर्यंत संपल्या. भाजी कुठेही शिल्लक नव्हती. हीच स्थिती फळांचीसुद्धा. फक्त लिंबू मात्र स्वस्त होते.
भाजीचे दर (प्रतिकिलो रुपये)
कोथिंबीर (50 रुपये पेंडी), लसूण (160), टोमॅटो (80), भोपळा (60), बटाटा (20), कांदा (12), कडीपत्ता (5/10 रुपये पेंडी), पोकळा (20), मेथी (20/25 रुपये पेंडी), शेपू (15/20 रुपये पेंडी), तांदळीची भाजी (15/20 रुपये पेंडी), पडवळ (40), फ्लॉवर (30), कोबी (20), वांगी (100), वरणा (80), हिरवी मिरची (80), पांढरा कांदा (20), भेंडी (80), कारले (60), दोडका (140), लिंबू (10 ला दहा नग).
फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)
तोतापुरी (100 रुपयाला तीन नग/50 रुपयाला 5 नग), अननस (10 रुपये नग), साधी केळी (30/35/40 रुपये डझन), डाळींब (30), ओला खजूर (160), सीताफळ (40).
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.