

Electricity consumers visit
sakal
मूलभूत गरजांइतकीच वीज ही जीवनावश्यक गरज आहे. घरगुती वापरांपासून उद्योगांपर्यंत सर्वत्र विजेवरच कामकाज अवलंबून आहे. ग्राहक नियमितपणे बिल भरून सेवेचा मोबदला देत असला, तरी अनेक वेळा सेवेतील त्रुटी, चुकीची बिले, अचानक वीज खंडित, मीटरसंदर्भातील अडचणी अशा तक्रारी उद्भवतात. वेळ, पैसा आणि श्रम खर्चूनही समाधान मिळत नाही. प्रत्येक जिल्ह्यात अशा तक्रारींची उदाहरणे आहेत; मात्र माहितीअभावी वीज ग्राहक मंचकडे दाद मागणाऱ्यांचे प्रमाण अद्याप कमी आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी जागरूक होणे आवश्यक आहे.