
‘हत्ती’, ऊसदर व्हाया जिल्हा परिषद आरक्षण, ‘गोकुळ’मध्ये नेत्यांची खुमासदार चर्चा
esakal
Gokul Milk Kolhapur Politics : डोंगळेसाहेब, कोणत्या हत्तीला उठवून बसवणार, यावर्षी उसाला पहिला हप्ता कोण किती देणार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण-कोणाचा गट खुला राहिला किंवा आरक्षण पडले, अशी खुमासदार चर्चा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या कार्यालयातील अध्यक्षांच्या केबिनमध्ये रंगली.
वसुबारसनिमित्त गोमाता पूजन, गुलाब जामून, पनीर पदार्थ विक्री प्रारंभ झाला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांची वाट पाहणाऱ्या आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे या नेत्यांमधील गमतीशीर चर्चेने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.