इचलकरंजीवासीयांचा प्रदूषणमुक्तीचा एल्गार

शहरात औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्न गंभीर; बोटींच्या ताफ्याने जलदिंडीचे अनोखे आगमन
‘चला, पंचगंगा वाचवूया’ ही शपथ घेताना मान्यवर.
‘चला, पंचगंगा वाचवूया’ ही शपथ घेताना मान्यवर.Sakal

इचलकरंजी - ‘सकाळ’तर्फे ‘पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत काढलेल्या राजर्षी शाहू कृज्ञतज्ञा जलदिंडीचा स्वागत व सांगता समारोप येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या वेळी इचलकरंजीकरांनी पंचगंगा प्रदूषणाविरोधात एल्गार करीत ‘चला, पंचगंगा वाचवूया’ अशी जलसंवर्धनाची सामुदायिक शपथ घेतली. पंचगंगा वरदविनायक मंदिर घाट परिसरात पंचगंगा नदीप्रेमींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. या वेळी घाटावर सुबक रांगोळी काढली होती. येथे जलदिंडी आल्यावर सुवर्णा प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखालील जीकेनगर तनिष्का गटाच्या महिलांनी कलश पूजन केले; तर हालगीच्या निनादात माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी सांगता सोहळ्याच्या ठिकाणी कलश आणला. येथे नदीतून ठिकठिकाणी घेतलेल्या पाण्याचे नमुने ठेवले होते. त्यातून निर्मळ ते प्रदूषित पाण्याचा प्रवास दिसून येत होता.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, की जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांनी याप्रश्नी सगळ्या घटकांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ही कृतज्ञता जलदिंडी समाजातील सर्वच घटकांना प्रोत्साहित करणारी आहे. प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी धरणातील राखीव पाणी सोडून नदी सतत प्रवाही ठेवण्याची आवश्यकता आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेऊन ‘सकाळ’च्या उपक्रमांतून झालेल्या सकारात्मक बदलांचा आढावा घेतला. रक्षाविसर्जन नदीत न करण्याच्या निर्णय हा यातून झालेला सर्वात मोठा बदल होता, असे नमूद त्यांनी नमूद केले. पंचगंगा नदीची ही अवस्था आपण टप्प्याटप्प्यांने बदलूया. यासाठी राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात काम करा; पण पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

निवेदक रविकिरण खल्ले यांनी जलसंवर्धानाची सामुदायिक शपथ दिली. याप्रसंगी माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, अपर तहसीलदार शरद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, काँग्रेसचे शशांक बावचकर, राहुल खंजिरे, राष्ट्रवादीचे मंगेश कांबुरे, अभिजित रवंदे, मनसेचे प्रताप पाटील, रवी गोंदकर, मनोहर जोशी, भाजपचे अनिल डाळ्या, इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील, राजू आरगे, व्‍हिजन इचलकरंजीचे कौशिक मराठे, रवी जावळे, सॅम आठवले, संदीप चोडणकर, संजय आरेकर, इनरव्हील क्लबच्या मीनाक्षी तंगडी, मनाली मुणोत, रिटा रॉड्रीग्यूस, विश्वास बालिघाटे, संजय जाधव, संजय होगाडे, वसंत सपकाळ, धरणगुत्तीचे शेखर पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, वरिष्ठ लेखा व्यवस्थापक अरविंद वर्धमाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, प्रशासन अधिकारी शरद पाटील, ज्येष्ठ पर्यावरणतज्‍ज्ञ उदय गायकवाड, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, बातमीदार गणेश शिंदे, राजकुमार चौगुले, अनिल केरीपाळे, संतोष कमते, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते. सांगता सोहळ्याचे नियोजन बातमीदार पंडित कोंडेकर, सहायक जाहिरात व्यवस्थापक दत्तात्रय टोणपे, बातमीदार ऋषीकेश राऊत, संदीप जगताप, संतोष जेरे, संतोष शिंदे, पद्माकर खुरपे आदींनी केले.

दरम्यान, शहरात औद्योगिक सांडपाण्याचा गंभीर प्रश्न आहे. याकडे प्रशासनाकडून गांभीर्यांने पाहिले जात नाही. यातून उघडपणे सांडपाणी बाहेर सोडल्यांने पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे. त्याबाबत प्रशासन पातळीवर गांभीर्याने घेतले जात नाही. याप्रश्नाकडेही या वेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लक्ष वेधले. जलदिंडीबरोबर वरदविनायक बोट क्लबच्या १५ बोटींचा ताफा होता. यामध्ये कयाकिंग, कनोईंग, रोईंग या प्रकारच्या या बोटी होत्या. यामुळे अत्यंत नेत्रदीपक असे पंचगंगा नदीपात्रात चित्र पहावयास मिळाले. डॉ. विजय माळी व गणेश बरगाले यांच्या मार्गदर्शनाखाली ३४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये पाच मुलींचा समावेश होता.

विविध घटकांचे मिळाले सहकार्य

जलदिंडीच्या सांगता सोहळ्यास आलेल्या नागरिकांना जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे यांनी सरबतची व्यवस्था केली होती. वरद विनायक भक्त मंडळाचे मोठे सहकार्य मिळाले. मंडळाचे बाळासाहेब जांभळे यांनी या सांगता सोहळ्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. रोटरी क्लब व इनरव्हील क्लबचे या मोहिमेला सुरुवातीपासून सहकार्य मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com