

किशोरवयात मुलींचे मासिक पाळीचे चक्र सुरू होते. दरवेळीच स्वतःच्या बॅगमध्ये सॅनिटरी पॅड ठेवायचे, अनेकदा त्या कोवळ्या वयात लक्षात राहत नाही.
esakal
Sanitary Pads In School : (नंदिनी नरेवाडी) : आठवीत शिकणारी ‘ती’ शाळेत तास सुरू असतानाच तिला लक्षात आलं की तिला ‘पिरेडस्’ आलेत. तिने मैत्रिणीला खुणेनेच विचारले, सॅनिटरी पॅड आहे का?, तिने नकारघंटा वाजवली. शाळा सुटायला अजून चार तास होते. रिक्षा लावल्यामुळे घरीही जाता येत नाही. पुढचे चार तास कसे काढायचे, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. एकाच जागी बसून राहिली.