
Nandani Village Elephant Legacy : गणेश शिंदे : तब्बल तेराशे वर्षांचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थानचे हत्ती पर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपुष्टात आले आहे. संस्थानच्या इतिहासातील ‘महादेवी’ ही तिसरी हत्तीण ठरली. सर्वधर्मियांच्या धार्मिक उत्सवांमध्ये आता ‘महादेवी’ची उणीव प्रकर्षाने भासणार आहे. शिवाय तिचा डामडौल, राजेशाही थाट, सर्वधर्मियांच्या उत्सवांमध्ये सहभागामुळे मिळणारी ऊर्जा, मिळणारा आशीर्वाद, मुलांमधील विशेष आकर्षण या साऱ्या बाबी आता केवळ आठवणीपुरत्याच शिल्लक राहणार आहेत.