

Inspring Story Engineer Marries Farmer
esakal
Educated Woman Marries Farmer : शेतीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचा संदेश देणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात घडली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या वैष्णवी कदम यांनी शहरातील नोकरी करणाऱ्या तरुणाऐवजी शेतकरी मनोज दळवी यांची जीवनसाथी म्हणून निवड केली. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.