CET Student Accident : इंजिनियरींगचे स्वप्न, ‘सीईटी’साठी सोलापूरला गेला; स्वामींचे दर्शन घेऊन कोल्हापूरला येताना वडिलांसमोरच मुलगा ट्रकखाली चिरडला

Kolhapur tragic accident : इंजिनियर होण्याचे स्वप्न घेऊन ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी सोलापूरला गेलेल्या विद्यार्थ्याचा परतीच्या प्रवासात भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना वडिलांसमोरच घडली.
CET kolhapur Student Accident in near miraj kalambi

CET kolhapur Student Accident in near miraj kalambi

esakal

Updated on

Student killed in truck accident : कळंबी (ता. मिरज) जवळ नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अठरा चाकी ट्रकखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सोलापूर येथे ‘सीईटी’ परीक्षा देऊन तो गावी कोल्हापूरला परतत होता. हरिप्रसाद संताजी चव्हाण (वय १८, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील आणि कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी संताजी चव्हाण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास कळंबीजवळ असलेल्या मरुधर हॉटेलजवळ अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com