
पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक
esakal
ठळक मुद्दे (Highlights):
सकाळी काढलेली पंचायत समिती सभापतीपदाची सोडत प्रशासनाच्या चुकीमुळे रद्द.
सायंकाळी नव्याने काढलेल्या सोडतीत शिरोळला अनुसूचित जाती व करवीरला सर्वसाधारण आरक्षण निश्चित.
माजी सदस्य महेश चौगुले यांनी धक्का बसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली; जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा दिला.
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज सकाळी ११ वाजता काढली. मात्र, आरक्षण सोडत काढल्यानंतर नियमातील बदल प्रशासनाच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी सकाळी निश्चित केलेल आरक्षण रद्द करून सायंकाळी परत सोडत काढली. त्यामुळे सकाळी आपल्या पसंतीचे आरक्षण पडल्याने खूश झालेले सायंकाळी मात्र हळहळ व्यक्त करत होते.