

कोल्हापुरात दर मंगळवारी भाजपमध्ये नवीन प्रवेश होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य.
esakal
Kolhapur News BJP : ‘केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. विरोधकांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे आता ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना भारतीय जनता पक्षात येणे योग्य वाटत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षात येऊ इच्छितात. त्यामुळे आता दर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होतील,’ अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. आज अप्पी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.