का तुटली सदाभाऊ आणि राजू शेट्टींची दोस्ती? सदाभाऊंनी सांगितले कारण 

ex mla sadabhau khot told about his past friendship raju shetty
ex mla sadabhau khot told about his past friendship raju shetty

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि एकेकाळी संघटनेची मुलुख मैदानी तोप अशी ओळख असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची दोस्ती संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. परंतु, गेल्या काही वर्षामध्ये या दोस्तीमध्ये अंतर पडले आहे. याबाबत सदाभाऊंनी काही आठवणी सांगितल्या आहेत. 

लाॅकडाऊन असल्याने सध्या अनेक नेते घरीच आहेत. सदाभाऊ खोतही सध्या घरीच आहेत. या वेळेत ते आपल्या चळवळीतील आठवणी फेसबुक पेजवर लिहित आहेत. त्यांच्या या लिखाणावर काहीजण त्यांना प्रश्नही विचारत आहेत. एकाने त्यांना तुम्ही आणि राजू शेट्टी पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला.  याच पार्श्वभूमिवर 'सरकारनामा'ने त्यांच्याशी संवाद साधला असता, सदाभाऊंनी चळवळीतील काही आठवणी सांगितल्या. 

राजू शेट्टी आणि माझी दोस्ती जिव्हाळ्याची होती. परंतु, काहींनी आमच्या दोस्तीत बिब्बे घातले आणि आमच्यात वाद पेटविला. आमच्या दोघांची दोस्ती तोडली. मला स्वाभिमानी शेतरी संघटनेत रहायचे होते. परंतु, मला संघटनेतून बाहेर काढले असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे.


पुढे बोलताना सदाभाऊ म्हणतात, मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता व्हायचे नव्हते. राजू शेट्टी हेच आमचे नेते होते. शरद जोशी यांच्यानंतर महाराष्ट्राला शेतकऱ्यांचा नेता मिळाला पाहिजे म्हणून आम्ही गडचिरोलीपर्यंत सभा घेतल्या. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. आम्ही जिवाभावाने राहत होतो. एकेदिवशी मिटींग सुरू असताना काही कार्यकर्त्यांसोबत माझा वाद झाला. त्यावेळी मी घरी येऊन झोपलो. त्यादिवशी रात्री साडेआकरा वाजता मला राजू शेट्टी यांचा फोन आला. त्यांनी मला विचारले भाऊ तुम्ही जेवला का? मी त्यावेळी जेवलो नव्हतो. त्यावेळी त्यांनी मला जेवायला लावले. 

हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                    

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्यांदा लढविलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या आठवणीही सदाभाऊंनी सांगितल्या. ते म्हणतात, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभेला मी उभा रहावे अशी राजू शेट्टी यांची इच्छा होती. आम्ही त्याबाबत गोपीनाथ मुंडे यांना भेटायला गेलो. त्यावेळी मुंडे साहेब म्हणाले राजू शेट्टी आमदार आहेत. मतदार संघात त्यांचे नाव आहे. त्यांची तेथे हक्काची मते आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा लढवू द्या. तुम्हाला आमदार करू. त्यानंतर राजू शेट्टी यांनी लोकसभा लढविली. सर्वच कार्यकर्त्यांनी त्यासाठी जिवाचे रान केले. अखेर पस्थापितांच्या विरोधातील लढाई आम्ही जिंकलो आणि राजू शेट्टी खासदार झाले.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी या आठवणी सांगताना त्यांच्या दोस्तीत काहींनीबिब्बा घातल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, हा बिब्बा कोणा घातला हे सांगितले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com