
Gokul Dudh Sangh Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये दूध उत्पादकांना दिलेल्या घड्याळ आणि जाजम यांची विनानिविदा खरेदी प्रक्रिया केल्यासह अन्य कारभाराबाबत ठाकरे सेनेचे उपनेते पवार यांनी शिष्टमंडळासह गोकुळच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकीय संचालकांना जाब विचारला होता. याचवेळी त्यांनी सहायक निबंधक (दुग्ध, कोल्हापूर) प्रदीप मालगावे यांच्याकडेही चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. या कारभाराची चौकशी होणार आहे. दरम्यान, यावर गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.