
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी(kolhapur carporation election) प्रभाग आराखडा १५ जानेवारीनंतर राज्य निवडणूक आयोगाला(state election commission) सादर होणार आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे संकट असल्याने आराखड्यास मुदतवाढ मिळाली आहे.पाच राज्यांच्या निवडणुका आज जाहीर झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई तसेच औरंगाबाद वगळून अन्य महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय(obc arakshan) या निवडणुका होत आहेत. महापालिकेने बहुसदस्यीय रचनेनुसार आराखडा सादर केला होता. निवडणूक आयोगाने त्यात काही बदल सुचविले. त्यानुसार दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. बहुसदस्यीस रचनेनुसार सर्वसाधारण गटातून ८० सदस्य निवडून येतील. ३२ प्रभागात सदस्य विभागाले जातील.
कोविडच्या संकटामुळे दीड वर्षापासून निवडणुकीचा खोळंबा झाला आहे. पहिल्यांदा एक सदस्यीय रचनेनुसार सोडत काढली गेली. नंतर बहुसदस्यीय रचना आल्याने एक सदस्यीस रचना रद्द झाली. एका प्रभागात १७ हजार २१० इतकी लोकसंख्या गृहीत धरून रचना झाली आहे. मार्चच्या अखेरीस अथवा एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोविडचे संकट असूनही सहा राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मार्च-एप्रिलमध्ये निवडणुक होईल या आशेने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे. मध्यंतरी संपर्क मोहिम मंदावली होती ती पुन्हा गतिमान झाली आहे.महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. भाजप ताराराणी आघाडी याच पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाईल. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्यास अधिक इच्छुक आहे.
शिवसेनेच्या भूमिकेची घोषणा?
जिल्हा बॅंकेच्या नूतन संचालकांचा उद्या (ता.९) संपर्कप्रमूख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते सत्कार होत आहे. महापालिकेसह, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असणार यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.