
पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी ५ लाखांची खंडणी
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
खंडणीसाठी दबाव: ट्रॅक्टर चालकावरील गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर; शाहूपुरी पोलिस ठाण्यात महिला आणि तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल.
फिर्यादीचा नकार व धमक्या: फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर “जामीन होऊ देणार नाही, सोडणार नाही” अशा धमक्या संशयितांकडून दिल्या गेल्या.
पोलिसांची कारवाई: पोलिसांनी १२ हजार रुपये रोख आणि चार मोबाईल असा ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल.
Police Complaint in Kolhapur : पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी ट्रॅक्टर चालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी महिलेसह चार साथीदारांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित नेताजी शिंदे याच्यासह आणखीन तीन महिला व एक अल्पवयीन मुलाचा गुन्ह्यात सहभाग उघड झाला आहे. याबाबत मारुती शामराव एकशिंगे (वय ७०, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांनी फिर्याद दाखल केली.