
Kolhapur Fake Branded Shirt
esakal
ठळक मुद्दे (Highlights) :
१४ लाखांचा मुद्देमाल जप्त – गांधीनगर येथील स्वस्तिक मार्केटमधील अन्सारी गारमेंटवर कॉपीराईट अधिकाऱ्यांनी छापा टाकून नामांकित कंपनीचे लेबल लावलेले ६१० बनावट शर्ट व साहित्य, एकूण १४.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मालकावर गुन्हा दाखल – गारमेंट मालक महंमद मिकाईन अन्सारी (रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) याच्यावर कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून तक्रार कंपनीचे अधिकारी नीरजकुमार धहीया (रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी केली.
व्यापाऱ्यांमध्ये खळबळ – कारवाईदरम्यान गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून पोबारा केला, तर कारवाई रात्री उशिरापर्यंत पोलिस व कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होती.
Fake Branded Shirts Sold Kolhapur : गांधीनगर (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्यावरील स्वस्तिक मार्केटमधील अन्सारी गारमेंटवर कॉपीराईटच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून नामांकित कंपनीचे लेबल लावलेले सुमारे १४ लाख ३८ हजार ७५० रुपयांचे बनावट शर्ट आणि मुद्देमाल जप्त केला.