

उदगाव, दानोळी, इचलकरंजीतील तरुणांचा समावेश, जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दापाश केला आहे.
esakal
Kolhapur Crime News : (गणेश शिंदे) : उदगाव (ता.शिरोळ) येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दापाश केला आहे. गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या रॅकेट मधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.