Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Kolhapur Police Fake Notes Case : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.
banavat nota japt kolhapur news

banavat nota japt kolhapur news

esakal

Updated on

Fake Currency Racket Kolhapur : बनावट नोटा खरेदीसाठी आलेल्या मजुरासह विक्री करणाऱ्या पेंटरला आज शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. गुरू राजेंद्र मेंगाणे (वय २३, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) आणि राहुल प्रकाश किरुगडे (३३, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, सध्या पाडळीखुर्द, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी आज दुपारी रेल्वेस्थानक परिसरात कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ३१ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com