
Kolhapur Crime News
esakal
बनावट कागदपत्रांचा वापर:
पाचगाव ग्रामपंचायतीचे खोटे लेटरहेड, शिक्के व सह्या बनवून नागपूर पशू व मत्स्य विद्यापीठाकडे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा प्रकार उघड झाला.
फिर्याद व अटक:
ग्रामपंचायत अधिकारी अजित राणे यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी निरंजन दिलीप गायकवाड (रा. सुभाषनगर) यास अटक केली.
गायकवाडचा बोलबाला:
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील चौकात गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा फलकांमुळे चर्चेत असलेल्या गायकवाडवर आता गुन्हा दाखल झाला आहे.
Kolhapur Pachgaon Grampanchayat : पाचगाव ग्रामपंचायतीच्या नावाची खोटी कागदपत्रे देऊन नागपूर पशू व मत्स्य विद्यापीठात सादर केल्याप्रकरणी आज पोलिसांनी एकास अटक केली. निरंजन दिलीप गायकवाड (रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पाचगाव ग्रामपंचायत अधिकारी अजित राणे यांनी प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.