
Family Farmland Dispute
esakal
दृष्टिक्षेपात...
दस्त नोंदणीसाठी मंडल अधिकारी व तलाठी यांचा पंचनामा महत्त्वाचा, योजनेच्या अंमलबजावणीने शेतकऱ्यांमधील वाद संपतील
अकृषिक, रहिवासी, वाणिज्यिक जमिनीस ही योजना लागू नाही, योजनेमुळे न्यायालयातील प्रकरणे मार्गी लागू शकतील
वादामुळे बंद असलेली शेतीतील वहिवाट पुन्हा सुरू होईल
Government Schemes Maharashtra : प्रवीण देसाई, भावकीतील वादात एकमेकांची जिरवाजिरवी करण्यामुळेच ‘सलोखा’ होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील हजारो प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. यातील बहुतांश प्रकरणात सलोखा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु दोन वर्षांतील अल्प प्रतिसाद पाहता योजनेचे भवितव्य स्पष्ट झाले आहे. योजना अतिशय चांगली असली तरी शेतकऱ्यांकडून त्याचा लाभ घेतला जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित असूनदेखील काही किरकोळ प्रकरणेच या ठिकाणी दाखल होत आहेत.