
कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे ही घडना घडली. एका ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले. महत्वाचे म्हणजे या महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.